पुणे, १ नोव्हेंबर २०२२: पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग लागली आहे. हे हॉटेल एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर असल्यानं आगीचे लोट च्या लोट पसरत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
कोंढव्यातल्या लुल्लानगर चौक परिसरात एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर एक प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलला आज पहाटेच्या सुमारास आग लागल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले, त्यांनी पोलिसांना कळवलं आणि अग्निशामक दलाला सांगितले. तोपर्यंत या आगीने क्षणार्धात आगीचे लोट च्या लोट निघत होते.
आतमध्ये सिलेंडरचे स्फोटही झाल्याचे आवाज ही येत होते. या इमारतीमध्ये अनेक दुकाने, ऑफीस आणि सोन्याची दुकाने आहेत. यामुळे अग्निशामक दल शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग एवढी भीषण असल्यामुळे हॉटेलमध्ये प्रवेश करताना अडथळे निर्माण होत आहेत.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, आतमध्ये सिलेंडर असल्याने चार ते पाच स्फोट झाले असून हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. आगीवर नियंत्रन मिळवण्याचे काम सूरु आहे. सुदैवाने या घटनेत कुटलीही जीवितहानी झाली नसुन आगीचे कारण समजू शकलेले नाही.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर













































