कराची, २८ डिसेंबर २०२०: पाकिस्तान मधील अशांत भाग म्हणजेच बलुचिस्तान प्रांतात झालेल्या हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पाकिस्तानी सैन्याने ही माहिती दिली. सैन्याने सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा प्रांतातील हरनाई भागात विद्रोहिंनी फ्रंटियर कॉर्पच्या चौकीवर गोळीबार केला आणि त्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. या गोळीबारात सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले. त्या भागाला घेराव घालून मोठी शोध मोहीम राबवण्यात आली.
पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, देशविरोधी सैन्याच्या पाठिंब्याने शत्रू सैन्याने हा हल्ला केला आहे. बलुचिस्तानमध्ये टिकून असलेली शांतता आणि समृद्धी अशा हल्ल्यांमधून नष्ट होऊ दिली जाणार नाही. त्याचवेळी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की, हल्ल्यात सैनिकांच्या मृत्यूमुळे आपण दु: खी आहोत. सैनिकांच्या नातलगबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांचा पुरस्कार करणारे इम्रान खान यांनी भारतावर हल्ल्याचा ठपका ठेवला आहे.
याव्यतिरिक्त, बलुचिस्तान प्रांतातील एका फुटबॉल क्लबजवळ आणखी एक हल्ला झाला. या बॉम्बस्फोटात किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी पाचगुर भागात हा स्फोट घडल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना स्थानिक परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाचच दिवसांपूर्वी बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलाने १० बंडखोर ठार केले होते. बलुच राष्ट्रवादी संघटनेशी संबंधित अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर अनेकदा हल्ले केल्याची माहिती आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे