इलेक्ट्रिक स्कूटर रिचाजिंग युनिटमध्ये लागली मोठी आग; सहा जणांचा मृत्यु

तेलंगणा, १३ सप्टेंबर २०२२: तेलंगणामधील सिकंदराबाद येथील हॉटेलच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्ज युनिटमध्ये लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यु झाला आहे. उर्वरित लोकांनी इमारतीवरुन उड्या मारल्या आहेत. त्यांना स्थानिकांनी वाचवले आहे.

सोमवारी रात्री मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिकंदराबाद येथील हॉटेलच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागली. या भीषण आगीच्या दुर्घटनेत चार मजली हॉटेलमध्ये राहणाऱ्या सहा जणांचा होरपळून मृत्यु झाला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागल्यानंतर धुराचे लोट पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पसरले. यात सहा जणांचा मृत्यु झाल्याची माहिती हैदराबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी दिली आहे. प्राथमिक अहवालानूसार ही आग इलेक्ट्रिक स्कूटर शोरुमच्या तळघरात लागली आणिती वरच्या मजल्यापर्यत पसरली. यामुळे जीवितहानी झाल्याचे आयुक्त यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा