महसूल गुप्तचर विभागाची मोठी कारवाई; दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त, तर तीनजण अटकेत

खडकी, १५ ऑक्टोबर २०२२: खडकी बाजार परिसरातून दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणात एक पानपट्टी चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे‌. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ४०० नोटा जप्त करण्यात आल्या आहे. महसूल गुप्तचर यंत्रणेमधील आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाने तिघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अतूलकुमार नरेशकुमार मिश्रा वय वर्ष २३, राहणार खडकी बाजार, सुरज वीरेंद्र शुक्ला वय वर्ष ३५ राहणार नवी खडकी, गुड्डभाई राजबाहदूर सेन वय वर्ष ४६ राहणार लोहगाव अशी नावे आहेत. आरोपी अतुलकुमार यांचे खडकीबाजार येथे पानपट्टीचा व्यवसाय आहे.

आरोपी शुक्ला अतुलचा ओळखीचा आहे. तो पानपट्टीत कामाला होता. शुक्लाकडे बनावट नोटा होत्या, त्याने अतुलला सांगितले की, दोन लाखांच्या नोटा वितरित केल्यास ३० हजार रुपये मिळतील, त्यांनुसार अतुल दोन लाखांच्या नोटा घेउन निघाला होता. ही माहिती महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांना लागली होती. त्यांनी ही माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला दिली.

एलफिस्टन रोडवर सापळा रचून अतूलला पकडण्यात आले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ४०० नोटा जप्त करण्यात आल्या व अतूलला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा या नोटा त्याने शुक्लाने दिल्याचे सांगितले. दोघांना ताब्यात घेतल्या नंंतर तिसरा मित्र सेन याचे नाव पुढे आले असता त्यालाही ताब्यात घेतले.

सेन आणि शूक्ला या दीघंनी या नोटा कोलकात्यातून आणल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा