एक मोठी कारवाई, डीआरजीच्या जवानांकडून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगढ,३१ऑक्टोबर२०२२: छत्तीसगढच्या कांकेर जिल्ह्यात अंतागढात पोलीस आणि नक्षलवाधांमध्ये आज पहाटे चकमक झाली आहे. या चकमकीत डीआरजीच्या जवानांनी दोन नक्षलवाधांना ठार मारले आहे. आज पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

छत्तीसगढ हा भाग पुर्णपणे घनदाट जंगल परिसर आहे. आज पहाटे जंगल परिरात काही हारकती दिसून येत होत्या. त्याच दरम्यान डीआरजीचे जवान गस्त घालत असताना हे आढळून आले असता. जवानांनी फायरींग चालू केली असता. समोरुनही गोळीबार झाला.

या चकमकीत दोन नक्षलवाधी ठार झाले तर बाकीचे जगंलाचा फायदा घेत पळून गेले. त्यांचा शोध सूरु आहे. अशी माहीती बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी दिली. तसेच कारवाईत मोठ्या प्रमाणात हत्यारे गोळाबारुद आणि नक्षलशी संबधित गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा