रॉकी नावाचा व्यक्ती रिपब्लिक पाहण्यासाठी विशाल भंडारीला पुरवत होता पैसे

मुंबई, १० ऑक्टोंबर २०२०: बनावट टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टीव्ही’चं पितळ उघडं पडत चाललं आहे. मुंबई पोलिसांच्या तपासणीत हंसा रिसर्च’चे माजी कर्मचारी विशाल भंडारी यांच्या डायरीतून अनेक खुलासे झाले आहेत. या डायरीत अनेक कुटुंबातील सदस्यांची नावं नोंदली गेली आहेत. पोलिसांनी या कुटुंबांची चौकशी केली असता हे समजलं की, रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी दरमहा एक निश्चित रक्कम दिली जात असे.

मुंबई पोलिसांच्या चौकशीत कुटुंबातील अनेकांनी सांगितलं की, विशाल भंडारीच्या वतीनं रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी आम्हाला दरमहा पैसे दिले जातात. मुंबई पोलिसांनी विशाल भंडारी आणि कुटुंबातील सदस्यांमधील संदेशांची देवाणघेवाण देखील रोखली आहे. रिपब्लिक चॅनलची टीआरपी त्याच घरांमध्ये अधिक आढळली, ज्या घरात विशाल भंडारी पैसे देत ​​असत. बनावट टीआरपी प्रकरणात अटक केलेले विशाल भंडारी, बोमपल्ली राव, नारायण शर्मा आणि शेट्टी यांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या चौघांची मुंबई पोलिस चौकशी करतील.

विशाल भंडारी मे २०२० पर्यंत होता सहभागी

ताज्या माहितीनुसार नोव्हेंबर २०१९ ते मे २०२० या कालावधीत विशाल भंडारी यांचा या कटात सहभाग होता. त्यानं आपल्या कामाचा गैरवापर केला, म्हणून जेव्हा या खटल्याची चौकशी सुरू झाली तेव्हा त्याला नोकरी सोडण्यास सांगितलं गेलं.

त्याच वेळी हे देखील समोर आलं आहे की बोंपल्ली राव मिस्त्री विशालच्या संपर्कात होता आणि मिस्त्री विशालला या कामासाठी २० हजार रुपये देत होता. त्यानं विशालला लोकांना बॉक्स सिनेमा आणि फॅक्त मराठी पाहायला सांगण्यास सांगितलं होतं. विशाल प्रत्येक घरात पैसे देत असे, परंतु तो लोकांना ४००-५०० रुपयेच देत असे आणि बाकीची रक्कम तो आपल्याकडेच ठेवत असे.

रॉकी बद्दल मुंबई पोलिस करत आहे चौकशी

रॉकी नावाचा आणखी एक व्यक्ती विशालच्या संपर्कात होता हा व्यक्ती लोकांना पैसे देऊन त्या बदल्यात रिपब्लिक टीव्ही बघण्यास सांगत होता. हा संपूर्ण घोटाळा देशभर पसरला आहे. सांगण्यात येत आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील टीआरपी मीटरची यादी भंडारीकडं असून ती अद्याप वसूल झालेली नाही. कोणत्या वाहिन्यांनी त्याला पैसे दिले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी आरोपीचे बँक स्टेटमेंट घ्यावं लागंल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा