गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

4

पुणे, दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या एकला गुन्हे अन्वेशन शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मुद्देमालासह अटक केली. त्याच्याकडून सहा किलो गांजा आणि एक दुचाकी असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चंद्रकांत सुरेश पवार वय २१, रा. म्हातोबाची आळंदी , मूळ गाव भूम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाला गस्तीवर असताना लोणी काळभोर भागात एक जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा लावून पवारला पकडले.

त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडील पिशवीमध्ये ६ किलो एवढा गांजा आढळून आला त्याचबरोबर एक दुचाकी ही मिळाली. यानंतर दुचाकी आणि गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा