गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा मालाडमधील २१ मजली निवासी इमारतीत भीषण आग

मालाडमधील २१ मजली निवासी इमारतीत भीषण आग

मुंबई, ३ डिसेंबर २०२२ : मुंबईतील मालाड परिसरातील जनकल्याण नगर भागात असलेल्या एका इमारतीला आग लागल्याची घटना आज घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उपनगरातील मालाड येथील २१ मजली इमारतीत शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. काही वेळातच या मजल्यावरून ज्वाळा निघू लागल्या. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि अथक प्रयत्नाने त्यांनी आग आटोक्यात आणली. आतापर्यंत या घटनेत कोणीही जखमी झाले नसून, नेमकी आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version