एस्के मूव्हीज स्टुडिओला भीषण आग

कोलकता, १३ ऑक्टोबर २०२२: कोलकाता येथील कुडघाट भागातील एस्के मुव्हीजच्या स्टुडिओला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत किती नुकसान झाले आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

या घटनेची अधिक माहिती देताना अग्नीशमन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, टॉलीगंज येथील गजबजलेल्या बाबूराम घोष रोडवर असलेल्या गोदामाला सकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी ही आग लागली. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, आग एवढी भीषण होती की, घटनास्थळापासून कित्येक दुरपर्यंत धूर दिसत होता.

आग लागल्याचे कळताच तात्काळ अग्निशमन दलाची पंधरा वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तासाभरात ही आग विझवली. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणीच जखमी झाले नाही. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा