नोएडा, ७ ऑक्टोबर २०२२: नोएडा येथील सेक्टर-३मधील एका प्लास्टिक कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली. आगीची घटना घडताच कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी जिवाच्या आकांताने धावाधाव केली. या घटनेचा एक व्हीडिओसुद्धा समोर आलेला आहे. यामध्ये आगीचं भीषण स्वरुप पाहायला मिळत आहेत.
ही आग एवढी भीषण होती की, घटनास्थळापासून कित्येक दुरपर्यंत धूर दिसत होता. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग विझवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चौदा गाड्या युद्धपातळीवर काम करत आहेत. दरम्यान, आजच्या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.