फागणे ग्रामपंचायतीत बोहल्यावर चढण्याआधीच नववधूने बजावले राष्ट्रीय कर्तव्य; निर्णयाची गावात चर्चा

पुणे, ता. १८ डिसेंबर २०२२ : धुळे जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याआधीच जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडणार आहे. आज सकाळपासूनच मतदानाला सुरवात झाली. मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. धुळे तालुक्यातील फागणे गावातील नववधू सीमा कुंभारने मात्र चक्क लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी तिच्या चेहर्‍यावर लोकशाही बळकट केल्याचा आनंद स्पष्टपणे जाणवत होता. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावा, असे अवाहनही तिने यावेळी केले. तिच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

धुळे तालुक्यातील फागणे येथे देखील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यावेळी फागणे गावातील कन्या विद्यालयात सीमा कुंभार या नववधूने प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावला. ‘आधी लग्न लोकशाहीचे, मग माझे’ असे म्हणत सीमा कुंभार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

आज राज्यात विविध ठिकाणी ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पाडत आहे. अशातच धुळे तालुक्यातील फागणे ग्रामपंचायतमध्ये चुरशीची लढत बघायला मिळत आहे. त्यात गावातील सीमा कुंभार या नववधूने ‘आधी मतदान आणि नंतर लग्न’ असा निर्णय घेऊन, गावातील कन्या विद्यालयात आपला मतदानाचा हक्क बजावला. सीमा कुंभार यांनी लग्नाआधीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे सर्वत्र गावभर त्यांच्या मतदानाची चर्चा रंगत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा