समंथा रुथ प्रभूच्या प्रेमाची नवी सुरुवात? चर्चेत आली अभिनेत्रीची खास बॉण्डिंग स्टोरी!

10

मुंबई ३ फेब्रुवारी २०२५ : साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच, समंथाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोंमुळेच तिच्या डेटिंगच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे.

नवा प्रेमसंबंध? फोटोमुळे वाढली उत्सुकता!

समंथाने अलीकडेच एका पिकलबॉल स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले, ज्यामध्ये ती राज निदिमोरू यांच्यासोबत खूपच आनंदी दिसत आहे. विशेष म्हणजे, एका फोटोत समंथा आणि राज हातात हात धरून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. या क्षणाने चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी हवा दिली आहे.

चार वर्षांनंतर समंथाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम?

समंथाने २०२१ मध्ये अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर, नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या. आता, समंथाच्या आयुष्यातही नव्या प्रेमाची चाहूल लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिग्दर्शक राज निदिमोरू कोण आहेत?

राज निदिमोरू हे ‘द फॅमिली मॅन’, ‘फर्जी’ आणि ‘सिटाडेल’ यांसारख्या यशस्वी वेब सिरीजचे दिग्दर्शक आहेत. समंथानेही त्यांच्या सोबत ‘रक्त ब्रह्मांड’ या आगामी प्रोजेक्टवर काम केले आहे. व्यावसायिक संबंधांमुळेच त्यांची बॉन्डिंग अधिक घट्ट झाल्याचे बोलले जात आहे.

अधिकृत दुजोरा नाही, पण चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता!

तथापि, समंथा किंवा राज यांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चाहत्यांना ‘लव्ह इज इन द एअर!’ असंच वाटू लागलं आहे. समंथा आणि राजच्या या नात्याचा पुढे काय होतं, हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा