मुंबई, १८ एप्रिल २०२३: २०१६ च्या तेलुगु चित्रपट देवदासूमधून पडद्यावर पदार्पण केलेल्या इलियाना डीक्रूजला हिंदी चित्रपटसृष्टीत रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत अनुराग कश्यपच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बर्फी’ या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे एक ओळख मिळाली. उत्कृष्ट कामामुळे नेहमीच तिथे कौतुक होत आले. आता लक्ष वेधून घेतले ते तिने केलेल्या पोस्टमुळे. तिने एका गोड पोस्टद्वारे सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे.अभिनेत्रीने बातमी देण्यासाठी एक गोंडस आणि सुंदर पेंडंटचा फोटो शेअर केला आहे.
काही तासांपूर्वी इलियाना डिक्रूझने तिच्या इंस्टाग्रामवर बाळाच्या छोट्या ड्रेसचा फोटो शेअर केला होता. ज्यावर अडवेंचर बिगीन असे लिहिले आहे. त्याचबरोबर तिने परिधान केलेल्या पेंडंटचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर ‘आई’ (ममा) असा शब्द लिहिलेला आहे. “लवकरच येत आहे, माझ्या बाळा, तुला भेटण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही”, असा कॅप्शन देत तिनेही गोड बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
ही पोस्ट टाकल्यानंतर काहीच मिनिटांमध्ये चहा त्यांच्या प्रतिक्रियांनी तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. अनेकांनी ह्रदयाच्या आकाराचे इमोजी शेअर केले असताना, इलियाना डिक्रूझची आई समीरा डिक्रूझने तिच्या नातवंडाच्या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले, “जगात लवकरच स्वागत आहे, माझ्या नातवंडांची वाट पाहू शकत नाही. तथापि, वडील कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक असल्याचा दिसून आलं.
यापूर्वी इलियाना ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अशी चर्चा चालू होती. दोघांचे आधीच लग्न झाल्याची अफवा पसरली होती. तथापि, २०१९ मध्ये या जोडप्याचे आधीच ब्रेक-अप झाल्याचे उघडकीस आले. इलियानाला लंडनमध्ये राहणारा मॉडेल सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलमध्ये पुन्हा प्रेम मिळाले आहे, जो अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊ आहे अशीही चर्चा रंगली होती. लॉरेंट हा त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी मुंबई आणि राजस्थान येथे उपस्थित होता. तेव्हाच सेबॅस्टियन आणि इलियाना रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे













































