गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा मन्यारवाडीत नवजात अर्भक सापडल्याने खळबळ

मन्यारवाडीत नवजात अर्भक सापडल्याने खळबळ

गेवराई, दि.२जून २०२० : गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी शिवारात नुकतेच जन्मलेले अर्भक आढळून आले. मन्यारवाडी शिवारात सकाळी एका अज्ञात महिलेने प्रसूतीनंतर स्त्री अर्भकाला जन्म देऊन रस्त्याच्या कडेला शेतात टाकून दिले. दरम्यान शेतात जाणाऱ्या महिलेला नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला.

त्या महिलेने आसपास शोध घेतला असता नुकतेच जन्मलेले अर्भक आढळून आले. महिलेने सरपंच शिवाजी लक्ष्मण डिंगरे यांनी ही माहिती दिली. नंतर सरपंच शिवाजी डिंगरे व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हे अर्भक गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

घटनेची माहिती गेवराई पोलिस ठाण्यास कळवली. उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.टाकसाळ हे अधिक तपास करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version