बारामती शहरात कोरोनाचा रुग्ण सापडला

13

बारामती, दि. १८ मे २०२०: बारामती शहरात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने बारामती शहरातली काही व्यवसाय सुरू करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मोरगाव येथील मुर्टी मध्ये कोरोना सदृश्य रुग्ण सापडल्याने बारामती तालुक्यात पुन्हा तणावाचे वातावरण आहे.

आज दिनांक १८/०५ /२०२० रोजी कोरोनाबाबत बारामती तालुक्यातील मुर्टी ता बारामती येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती मुंबई येथून आपल्या मुर्टी येथील राहत्या घरी आली होती. कोरोना रुग्ण सध्या बारामती येथील सरकारी दवखण्यात डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांना रुई येथील कोरोना निवारण कक्षात नेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ सदानंद काळे यांनी सांगितले आहे.

त्यामुळे मुर्टी महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तरी सर्व मुर्टी , ता. बारामती येथील नागरिकांना उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांनी आवाहान केले आहे. यामध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लाॅकडॉऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये व प्रशासकीय यंत्रणेस सर्वेच्या कामात व कायदा व सुव्यवस्थाच्या कामात सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव