गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई पत्रकार अर्णब गोस्वामीच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार

पत्रकार अर्णब गोस्वामीच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार

मुंबई,६ नोव्हेंबर २०२० : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामीच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं आज तहकूब केली.

या प्रकरणाचा नव्यानं तपास करावा यासाठी नाईक कुटुंबानं एका याचिकेची सुनावणी न्यायालयानं आज केली. त्याबरोबरच गोस्वामीच्या याचिकेवरही सुनावणी झाली.
आता आज दुपारी ३ वाजता यावर सुनावणी होईल. अर्णबच्या सुटकेसाठी हंगामी आदेश द्यावा या विनंतीबाबत न्यायालय विचार करणार आहे. काल अर्णब गोस्वामीच्या वतीनं जेष्ठ वकील हरीश साळवे यांनी न्यायालयात बाजू मांडली. हा तपास बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला.

आम्ही या बाबतीत सखोल तपासणी करायला तयार आहोत, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.आपली याचिका सुधारित करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती साळवे यांनी न्यायालयात केली ती न्यायालयानं मान्य केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version