बारामती, ५ ऑक्टोंबर २०२०: बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांची पाहणी केली. यावेळी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस विभागाची सर्व कामं येत्या दोन वर्षात मार्गी लागतील असं संगीतलं. यामध्ये अत्याधुनिक व सर्व सोयींनी नवीन इमारतींचा समावेश आहे.
बारामती शहर व परिसरात होणाऱ्या पोलीस उपमुख्यालाय, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस वसाहती, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, बारामती शहर पोलीस स्टेशन नवीन सुसज्ज ठिकाणी उभारणार आहे. तसंच वाहतूक शाखेची इमारत, तसंच वळचंदनगर, सुपे व माळेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारती उभारणार आहे.
याबाबत पवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत पाटसरोड वर ६६ एकरात पुणे जिल्ह्याचे उपमुख्यालाय होणार आहे. तातडीच्या वेळी पोलिसांची तुकडी वेळेत पोहोचावी यासाठी याचा फायदा होणार आहे.
या उपमुख्यालयासाठी ४१० पदे मंजूर असुन यासाठी राज्यसरकारकडं १०० कोटींची मागणी केली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सांगितलं.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव.