खेड तालुक्यात पोलीस पाटलावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती

राजगुरूनगर, दि. २९ जून २०२०: खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथील पोलीस पाटला वर गोळीबार झाल्याची घटना घडली असून यामध्ये पोलीस पाटील सचिन भीमसेन वाळुंज या हल्ल्यात जखमी झाले आहेत त्यांच्यावर राजगुरूनगर येथील खाजगी रुगणालायत उपचार सुरू आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पाटील वाळुंज हे गावामध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या पाणी टाकीची जागा दाखविण्यासाठी ठेकेदारा सोबत आले असताना पाऊस सुरू झाला यावेळी त्या ठिकाणी दबा धरून बसलेले सौरभ अनिल ढोरे, विपुल भीमाशंकर थिगळे, बंटी उर्फ अतुल काळूराम भांबुरे, ( सर्व राहणार वरची भांबुरवाडी ) यातील एकाने गावठी कट्टा वाळुंज यांच्या वर रोखला असता जिवाच्या भीतीने वाळुंज यांनी त्याठिकाहून पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटा च्या वर रक्तश्राव सुरू झाला, एकूण चार वेळा गावठी गठ्ठा रोखला मात्र यातून एकच गोळी उडाली आणि ती मनगटावर लागली.

यावेळी त्यांच्या सोबत असलेले ठेकेदार कौटकर यांनी त्यांना राजगुरूनगर येथील खाजगी रुग्णालयात आणले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून हाताचे हाडा मधून गोळी आरपार गेली आहे.

हा खुनी हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून खेड पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे. उर्वरित आरोपीसाठी दोन पथके पाठविण्यात आली असल्याची महिती खेड पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुनील थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा