भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसाने स्वत:वर झाडली गोळी

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२३ : भायखळा तुरूंगाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतः वर गोळी झाडून घेतल्याची घटना घडली आहे. श्याम वरगडे असे या पोलीस हवालदाराचे नाव असून ते ४८ वर्षांचे होते. ताडदेव येथील सशस्त्र विभागात कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरगडे यांनी एसएलआरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. ही घटना गुरुवारी (२३ फेब्रुवारी) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच रात्रपाळी निरीक्षक आर शेख हे घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जखमी वरगडे यांना जे जे रूग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपाडा पोलीस ठाण्याच्या हददीत भायखळा जेल गार्ड म्हणून नियक्तीवर असलेले पोलीस हवालदार श्याम वरगडे यांनी गोळी झाडून घेतली त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस हवालदार वरगडे हे जुनी पोलीस वसाहत हंसराज लेन, भायखळा पोलीस ठाणेच्या बाजूस भायखळा येथे राहत. दरम्यान, या हवालदाराने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? या संदर्भात नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा