रायगड, दि.२९ एप्रिल २०२०: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बँ. ए. आर अंतुले याचे सुपुत्र नविद अंतुले यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.
त्यांच्या निधनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षे राजकारणापासून दूर असलेल्या नविद अंतुले यांनी मागील वर्षी अचानक राजकारणात प्रवेश करून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे सुपुत्र असणाऱ्या नविद अंतुले यांच्या राजकारण प्रवेशामुळे रायगडच्या राजकीय अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यांच्या अचानक शिवसेनेच्या बाजूने उभे राहण्याच्या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
त्यांची अल्पायुषी राजकिय कारकिर्द अयशस्वी ठरली. नविद अंतुले यांना रात्री उशिरा हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराला साथ न देता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचा दफनविधी मुंबईतच होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































