कर्नाटकच्या जंगलात दुर्मिळ काळा पँथर सापडला

6

नागरहोल, कर्नाटक, ७ जुलै २०२० : ” जंगल नेहमीच जिवंत आहे आणि ते नेहमीच काही ना काही पहातच असते .” या म्हणण्यानुसार कर्नाटकच्या काबिनीच्या जंगलात, निसर्गवादी आणि वन्यजीव छायाचित्रकार शाझ जंग यांनी एक भव्य काळा पँथर दिसला आणि त्यांनी त्याचे छायाचित्र ही काढले.

ब्लॅक पँथरबद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बुकमधील काल्पनिक पात्र ‘बघेरा’ किंवा मार्वल सिरीज मधील वकांडातील सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नायक ‘द ब्लॅक पँथर’ ची कल्पना करतो . वन्यजीवप्रेमींना मोठा आनंद मिळवून देताना कर्नाटकच्या नगरहोल व्याघ्र प्रकल्पातील काबिनी भागात एक भव्य दुर्मिळ ब्लॅक पँथर सापडला आहे.

सदर घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार, “साया” नावाच्या या काळ्या पँथरचा २०१५ मध्ये प्रथम शोध लागला होता आणि तेव्हापासून ट्रॅक करणार्‍यांना हे समजून घेण्यात अपयश आले आहे की या भागात पूर्वी काळ्या रंगाच्या पँथरची कोणतीच नोंद कशी काय नाही. या काळ्या पँथरचे फोटो हे earth.org या अधिकृत ट्विटर हँडलवरून अपलोड करण्यात आले आहेत.

ही छायाचित्रे मूळत: भारतीय निसर्गवादी आणि वन्यजीव छायाचित्रकार शाज जंग यांनी २०१९ मध्ये काढलेली होती. या छायाचित्रांमध्ये, भव्य बिबट्या जंगलात वावरताना आणि झाडांच्या मागून कॅमेर्‍याकडे डोकावताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा