जेजुरी १६ डिसेंबर २०२३ : भारतीय लोकदैवत साक्षात भगवन्त श्रीकृष्ण श्रीराम यांचेही भक्तीस्थान असलेल्या, कृतयुगीन कुलस्वामी खंडोबाच्या महत्वपूर्ण तीर्थस्थळ जेजुरीच्या जयाद्री पर्वतावरील खंडोबा मंदिरात, सालाबादप्रमाणे चंपाषष्ठी उत्सवातील देवदिवाळी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी अयोध्या येथील प्रभु श्रीरामाच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा करण्यात आला. यामध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती, प्रभु श्रीराम, माता सीता, लक्ष्मण तसेच रामभक्त हनुमान यांच्या मुर्ती, फळे, फराळ, मिठाई यांची आरास करण्यात आली. तसेच आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे पुजन करून तो देखील येथे मांडण्यात आला होता.
सदर देवतांच्या मूर्ती आहिल्यादेवी होळकर ट्रस्ट च्या पालखी मध्ये बसवून सर्व खांदेकऱ्यांनी श्री क्षेत्र कडेपठार येथे नेली. तेथे श्री कडेपठार देवस्थान तर्फे भंडारा उधळून पालखीचे शाही स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी जय मल्हार जय श्रीराम चा जयघोष केला. हरी हरा भेट सोहळा सर्वांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री कडेपठार चंपाषष्ठी अन्नदानसेवा मंडळ, श्री कडेपठार देवस्थान, पुजारी, सेवेकरी वर्ग, मानकरी खांदेकरी मंडळ आणि समस्त जेजुरी ग्रामस्थ यांच्यातर्फे करण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनीधी : विजयकुमार हरीश्चंद्रे