गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई मुंबईतील कांदिवली (पश्चिम) भागात रहिवाशी चाळ कोसळली

मुंबईतील कांदिवली (पश्चिम) भागात रहिवाशी चाळ कोसळली

मुंबई, दि.१० मे २०२०: मुंबईमधील कांदिवली (पश्चिम) भागात असणारी रहिवासी चाळ कोसळली. या चाळीच्या ढिगाऱ्याखाली ५-६जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

आज(रविवारी) सकाळी च्या सुमारास ही घटना घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनीने सांगितले आहे. त्यानंतर एनडीआरएफची एक टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. कांदिवली (पश्चिम) येथील दलजी पाडा येथील सबरिया मशिदीच्या मागील एक चाळ कोसळली आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना स्थानिकांनी बाहेर काढलं आहे. मात्र, ५-६ रहिवासी अडकल्याची शक्यता असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सचिन नलावडे यांच्यासह इतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version