मोरगाव रोड येथील रहिवाशी असून शहरातल्या शहरात दुजाभाव होत असल्याची नागरिकांची तक्रार

बारामती, ९ सप्टेंबर २०२०: बारामती शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या बारामती नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्याची, तिथल्या स्वच्छतेची दुर्दशा झाली आहे. बारामती शहरात विकासाची गंगा वाहत असताना बारामती मधील जुना मोरगाव रोड ते धावजी पाटील मंदिराच्या पुलापर्यंत नगर पालिकेची हद्द आहे. हा परिसर पालिका हद्दीत आल्यापासून येथील रहिवाशांना पालिकेचे सर्व कर लागू झाले आहेत. मात्र सुव्यवस्थेच्या बाबतीत हे लोक दुर्लक्षित राहिल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले आहे.

बारामती शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या बारामती मोरगाव जुना रस्त्याच्या सुरुवातीलाच शहरात प्रवेश करताना लेंडी नाल्यामध्ये बारा महिने मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. शहरात प्रवेश करतानाचे हे चित्र अत्यंत विदारक दिसते. याचा बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुण्यांनवर वाईट परिणाम  होतो आहे. या भागतील रहिवाशी मागील तीन वर्षांपासून बारामती नगरपालिकेकडे तक्रारी करत आहेत.

मात्र आज पर्यंत कोणीही याची दखल घेतली नसल्याचे येथील रहिवाश्यांनी सांगितले आहे. या रस्त्याच्या कडेला अनेक खाजगी बस, तसेच मोठ्या संख्येने गॅरेज असल्याने मोठी वाहने ,बस गाड्या अशा रस्त्याच्या कडेला उभ्या असतात. कडेला अनेक ठिकाणी झाडे झुडपे वाढली असून कचऱ्याचे ढीग साठले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या वाहतुकीचा खोळंबा होतो.

वस्तीतील नागरिकांना साप व भटक्या जनावरांचा त्रास होतो आहे. लेंडीनाला ते बारामती पालिका हद्दीतील रस्त्याच्या कडेला कोठेही साईड पट्टी नाही. पालिकेने या साईड पट्ट्या उकरून ठेवल्याने रस्त्यावर चिखल साठून दुचाकी वाहने घसरल्याच्या घटना घडल्या आहेत.

खंडोबा नगर, जुना जकात नाका चौकात थोडा पाऊस झाला तरी गुडगा भर पाण्याचे तळे साचते आहे. पालिकेची हद्द असणाऱ्या धावजी पाटील मंदिरापर्यंत रस्त्याच्या कडेला लाईटचे खांब उभे आहेत, पण यावर लाईट नाहीत. या रस्त्याच्या कडेला बाभळीची झाडे वाढून त्याच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला डांबरीकरण केले आहे तर एक पट्टी तसेच खडीकरण ठेवले असल्याने येथे अनेक वेळा दुचाकी स्वार घसरून पडले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा