बुलढण्यात रेतीच्या टिप्परने पोलिसाला चिरडले

7

बुलढाणा, दि.३०एप्रिल २०२० : लॉकडाऊनच्या काळातही रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टिप्परचा पाठलाग करणाऱ्या पोलिसाला टिप्पर चालकाने चिरडून ठार केल्याची घटना खामगांव तालुक्यातील माटरगांवजवळ घडली आहे.

याबाबत चालक व मालकासह एकूण ५ जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना अवैध रेती वाहतुकीची खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर जलंब पो.स्टेचे काँ उमेश सिरसाट हे होमगार्ड श्रीकृष्ण वानखेडे यांना घेऊन माटरगांव रोडवर गेले. त्यावेळी टिप्पर क्रमांक एम एच २८, बीबी ४९२३ हे अवैध रेती घेऊन जातांना आढळले.

या दोघांनी रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून त्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र, टिप्पर चालक गवळी याने सिरसाट यांच्या अंगावर टिप्पर घालून त्यांना चिरडले आणि घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेतून बचावले होमगार्ड यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली व त्यांनी लगेच घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने टिप्पर चालक विशाल गवळी याला माटरगांव येथून अटक केली.
चालक गवळी व मालक सुधाकर मिरगे रा. भास्तान, गोपाल शामराव बेले, लक्ष्मण रामकृष्ण इंदोरे रा. माटरगांव व श्रीकृष्ण साहेबराव मिरगे रा. भास्तन या पाच जणांविरुद्ध कलम ३०२, ३५३, १४३, १९० भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास ठाणेदार इंगळे करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा