एक धक्कादायक प्रकार: दीड महिन्यांच्या बाळाला पाजला मुदत संपलेला डोस

बीड, ११ नोव्हेंबर २०२२: बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आठ महिन्यांपुर्वी मुदत संपलेला डोस एका दी-ड महिन्यांच्या बाळाला पाजण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. बीडच्या माजलगाव शहरात असणाऱ्या पवार हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

या नंतर बाळाच्या आजोबांनी रुग्णालयाविरोधात थेट आरोग्य विभागाकडं तक्रार दाखल केली असून, या प्रकारा नंतर बाळाच्या नातेवाईकांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. माजलगावमध्ये राहणारे अशोक धारक यांच्या मुलीची प्रसूती दीड महिन्यांपुर्वी झाली होती. या बाळाला घेऊन डोस देण्यासाठी आजोबा शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये गेले होते.

यावेळी नर्सकडून रोटाव्हायरस हा डोस पाजण्यात आला, तर न्युमोकोकल हा डोस कंपाउंडरने मांडीला दिला. मात्र हा डोस मेडिकलमधून न मागवता हॉस्पिटलमधील एका रुममधून आणला. त्यामुळं आजोबांना संशय आल्यानं त्यांनी बॉक्सचा फोटो काढला आणि घरी आल्यावर मुलीला दाखवला. या नंतर मुदत संपलेला डोस आपल्या मुलीला दिल्याचं समोर आलं.

या प्रकरणी डॉक्टर पवार यांनी असं सांगितलंय की, या डोसमुळं काही परिणाम होणार नाही. बाळाला आम्ही पुन्हा दुसरा डोस देणार आहोत. असं सांगण्यात आलंय. आता आरोग्य विभाग काय कारवाई करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा