लोकडॉऊन मध्ये पार पडला साध्या पद्धतीने विवाह सोहळा

राजगुरूनगर, दि. २८ एप्रिल २०२०: विवाह म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो, अनेक स्वप्न घेऊन हातावर मेहंदी, नखाला नेलपॉलिश, साखरपुडा हळद, लग्न आणि स्वागत समारंभ यासाठी वेगवेगळे पोशाख आणि नटून हा सोहळा आनंदमय करण्यात येतो, मात्र आता कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मुळे सर्व दुकाने बंद आणि त्यात पुणे जिल्ह्यात संचार बंदी यामुळे विवाह सोहळा करण्यासाठी अनेक बंधन आली असताना खेड तालुक्यातील सातकरस्थळं येथील शेटे आणि नाईकरे कुटुंबांनी सोशल डिस्टनस पाळत १० ते १५ वऱ्हाडी मंडळी मध्ये गणपती मंदिरामध्ये विवाह सोहळा पार पाडला.

खेड तालुक्यातील नाईकरे परिवारातील गौरव आणि शेटे परिवारातील ऐश्वर्या यांचा डिसेंबर महिन्या मध्ये साक्षीगंध चा कार्यक्रम पार पडला होता त्यानंतर त्यांनी २७ एप्रिल ला विवाहाचा मुहूर्त काढला, विवाहाची सर्व तयारी त्यांनी पूर्ण केली होती. कार्यालय, केटर्स, वाजंत्री, छायाचित्रकार, डेकोरेशन, लग्न पत्रिका याची पूर्ण तयारी या कुटुंबानी केली होती मात्र मार्च महिन्यात कोरोना मुळे भारतात लोकडॉऊन करण्यात आले आणि हे लोकडॉऊन पुन्हा ३ मे पर्यंत वाढविण्यात आले, मात्र कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होत असताना या कुटुंबाने हा विवाह सोहळा ठरलेल्या तारखेला शासनाच्या नियमावली नुसार करण्याचे ठरविले आणि मोजक्या वर्हाडी मंडळी सह साध्या पद्धतीने राजगुरूनगर येथील मंदिरात हा विवाह सोहळा संपन्न केला. विशेष म्हणजे या नव दांपत्याने तोंडाला मास्क लावून विवाह समारंभ पार पाडला, लोकडॉऊन मध्ये ही विवाह झाला तरीही दोन्ही नवं दांपत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

अनकट न्यूज प्रतिनिधी – सुनिल थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा