नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा चांदोरे रोडवर असलेल्या पुलावरून छोटा हत्ती टेम्पो कोरड्या नदीत कोसळला

नांदगाव, नाशिक १२ नोव्हेंबर २०२३ : साकोरा गावाजवळ बाळनाथ महाराज मंदिराकडे जात असताना चारचाकी पिकअप वाहन क्रमांक एम एच 41जी 7643 ही गाडी पुलावरून थेट नदी पत्रात कोसळल्याची घटना घडली आहे. दुर्दैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

साकोरा गावातुन पुलावरून चांदोरा कडे जात असतांना चालकाने समोरुन येणाऱ्या मोटार सायकलला वाचवण्यासाठी गाडी वळवली, मात्र पुलावर खड्डे असल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी पुलाच्या कठड्यावर आदळत चार ते पाच फूट कोरड्या नदीत कोसळली,मात्र या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.

सुदैवाने पाणी नसल्याने नदी कोरडी ठाक होती. येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने चालकाला सुरक्षित गाडी बाहेर काढले. मात्र या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा