भरधाव कार पुलावरून कठडा तोडून नदीत कोसळली, ५ जण जखमी

6

बुलढाणा, ३१ ऑक्टोबर २०२२ : बुलढाणा जिल्ह्यात जालना-खामगाव महामार्गावरील जांभोरा पुलावर, भरधाव कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली.पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या कारमधील पाच प्रवासी होते. हे सर्व प्रवासी जखमी झाले असून यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातातील एमएच २० ईवाय ०४८८ या क्रमांकाची ही कार होती. या अपघातामध्ये कारच्या पुढच्या आणि मागील बाजूलाही जबर दणका बसला. अपघातानंतर कारमधील जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते. हे पाचही प्रवाशी गंभीर जखमी झाले असल्याचे कळते. जखमी प्रवाशांना खासगी तसंच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघात कशामुळे झाला हे समजू शकले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा