भारताच्या टेलिस्कोपने टिपला कृष्णविवराने नष्ट होणारा तारा

मुंबई, ३ डिसेंबर २०२२ : भारताच्या पहिल्या रोबोटिक ऑप्टिकल रिसर्च टेलिस्कोपने कृष्णविवराकडून गिळंकृत होत असलेल्या एका ताऱ्याला टिपले आहे. त्यामधून निघणारा प्रकाश यामध्ये कैद झाला आहे. त्याला ‘ऑप्टिकल फ्लेयर’ असे म्हटले जाते. याबाबतची माहिती नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे‌.

आयआयटी बॉम्बेतील ॲस्ट्रोफिजिसिस्टवरून भालेराव यांनी सांगितले, की ज्यावेळी कृष्णविवर आणि तारा आमने-सामने झाला त्यावेळी हा तारा तसाही मृत्यूच्या मार्गावरच होता. या चकमकीत कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने ताऱ्याचे तुकडे केले. हे तुकडे कृष्णविवराच्या आसपास विखुरले गेले आणि चारही बाजूंनी फिरू लागले.

अर्थात ब्रह्मांडात होणाऱ्या स्फोटांचे व त्यामागील कारणांचे अध्ययन करणे. आता जी घटना या टेलिस्कोपने टिपली आहे तिला ‘एटी२०२२सीएमसी’ असे नाव देण्यात आले आहे. एकदम निर्माण होऊन हा प्रकाश लुप्त होत होता, असे संशोधकांनी म्हटले आहे. ही घटना पृथ्वीपासून ८.५ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर झाली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा