सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहिल्यादेवींचा पुतळा उभारणार: गोपीचंद पडळकर

सोलापूर, दि.१ जून २०२०: सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सर्वात उंच पुतळा उभारणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे पुतळ्याचे पूजन माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार पडळकर म्हणाले की, देशामध्ये साधारणपणे ७८९ विद्यापीठ आहेत. त्या प्रत्येक विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये समाजसुधारक, राष्ट्रपुरूष आणि क्रांतिवीरांचे पुतळा उभारलेले आहेत. त्याच धर्तीवर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये सर्वात मोठा व उंच असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात येईल.

या पुतळ्यासाठी लागणारा खर्च राज्यातील देशातील धनगर समाज व विविध संघटना उभारतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असणाऱ्या चौंडी गावच्या विकासासाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री महादेव जानकर, प्राध्यापक राम शिंदे आदींनी प्रयत्न केले असल्याचेही आमदार पडळकर यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा