चंद्रपूर, दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ : सध्या राज्यात ईडी, सीबीआय किंवा इतर चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून अनेक लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विरोधकांकडून भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन आहे. असे आरोप वारंवार होत आहेत. आता असाच अनुभव पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये हत्या आणि दंगलीच्या गुन्ह्यात आरोपी माजी नगरसेवकाने भाजपात प्रवेश केला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत
या माजी नगरसेवकाचे भाजपात स्वागत केले.
माजी नगरसेवका अजय सरकार यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर हत्येसह आकरा गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे चंद्रपूर शहरात चर्चेला उधाण आले आहे. शहरातील बंगाली कॅम्प भागात वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
हत्येच्या गुन्ह्यासह अकरा गुन्हे दाखल असलेल्या अजय सरकार यांच्या भाजप प्रवेशाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.त्याचा बंगाली कॅम्प भागात प्रभाव आहे. मागील वर्षभरात गँगवॉर सदृश्य अनेक प्रकरणात अजय सरकार यांचा सहभाग उघड झाला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर