कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी घसरण; इंधन दर ‘जैसे थे’

नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२२ : कच्च्या तेलाच्या दरात आज म्हणजेच गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ झाली. तर गुरुवारी (ता. २९ डिसेंबर २०२२) कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. यादरम्यान, ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत ८२.७२ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत घसरली. तर डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रतिबॅरल ७८.५१ डॉलर इतके आहे.

मात्र, देशांतर्गत बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या सात महिन्यांपासून एकाच पातळीवर कायम आहेत. आज म्हणजेच गुरुवारीही देशात इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. २९ डिसेंबर २०२२ रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. म्हणजे सर्वसामान्यांना किंचित दिलासा मिळाला आहे.

गेल्या सात महिन्यांपासून अधिक काळ देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्कानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रत्येक राज्यानुसार बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेतला जातो. २२ मे रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी व्हॅट कपात करीत सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्राच्या निर्णयाचा मागोवा घेत काही राज्य सरकारांनी देखील कर कपात जाहीर केली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा