गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सोलापुरमधील एक धक्कादायक प्रकार; एका महिलेला चोरी करताना रंगेहाथ पकडले

सोलापुरमधील एक धक्कादायक प्रकार; एका महिलेला चोरी करताना रंगेहाथ पकडले

सोलापुर, २८ ऑक्टोबर २०२२: सोलापुर बसस्थानकामध्ये महिलांचे सोने चोरीला जाण्याच्या घटनेत मोठी वाढ झाल्याने सोलापुर बसस्थानक चर्चेत आले होते. यावरुन पोलिसांनी जाळे लावत एका महिलेला रंगेहाथ पकडले आहे. या महिलेने अनेक जणांचे सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती समोर आली आहे‌.

मिळालेल्या माहितीनुसार सोलापुर पोलिसांनी बस स्थानकावर महिला प्रवाशांचे सोने लुटणाऱ्या महिलेस अटक केली आहे. हाताला काम नाही कुठे रोजगार मिळत नसल्याच्या कारणावरुन त्या महिलेने चोरी केल्याची माहिती हाती लागली आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे चोरीचा धंदा सूरु केल्याची कबुली दिली आहे.

आयेशा युसूफ शेख अंस ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या कडून एकूण साडेबारा तोळे वजनाचे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयेशा शेख ही गरीब परिस्थितीमुळे तिने चोरीच्या धंदा सूरु केला होता.

तिला एकूण सहा अपत्य आहे. आणि सर्व घरांची जबाबदारी तिच्यावर आहे. ती बसमध्ये बुरखा घालुन चोरी करत असे. सोलापुर पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मागे होते. अखेर पोलिसांना तिला पकडण्यात यश आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version