औरंगाबाद मध्ये एक धक्कादायक प्रकार; मुलीची छेड काढली, मग आत्महत्याचा केला बनाव

10

औरंगाबाद, ६ ऑक्टोबर २०२२: औरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन या मुलींच्या वस्तीगृहाजवळ एका मुलीची एका टवाळखोराने छेड काढली. त्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेत घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ पावलं उचलत छेड काढणाऱ्या तरुणाचा शोध सूरु केला.

तरुणाचा शोध करायला पोलिस घटनास्थळी पोहचले,पण तरुण न सापडल्याने पोलिस तरुणाच्या घरी पोहचले. मात्र तरुणाला पोलिस घरी येणार असल्याची चाहूल लागली होती. म्हणून तरुणानी गळफास घेत आत्महत्येचा बनाव केला. त्या तरुणाचे नाव साईनाथ असे आहे.

साईनाथच्या खोलीत छताला साडी बांधलेली होती. तर तो खाली झोपलेला होता. पोलिसांनी तपासणी केली असता त्यांना संशय आल्याने साईनाथच्या आंगावर पाणी टाकले, मग साईनाथ गडबडून उठला. पोलिसांनी त्याच्यां भाषेत विचारले असता त्याने कबुली दीली.

मी आत्महत्येचा बनाव केला होता. हा सर्व प्रकार जेव्हा त्या मुलीला समजला तेव्हा तिने पोलिस ठाण्यात जाउन आपली तक्रार मागे घेतली आहे. या सर्व प्रकारा नंंतर पोलिसांनी साईनाथला समज देउन सोडले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर