काबूलमध्ये शैक्षणिक संस्थेवर आत्मघाती हल्ला; तर ऐकोनीस जणांचा मृत्यु

अफगानिस्तान, ३० सप्टेंबर २०२२: अफगानिस्तानाची राजधानी असलेल्या काबूलमध्ये शैक्षणिक संस्थेवर आत्मघाती हल्ल्यात ऐकोनीस जण मृत्युमुखी झाले आहेत. मृत्युमध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे‌. या संस्थेचे नाव काज आसे आहे.

अफगानिस्तान मधील अल्पसंख्ख्याक हाजारा समुदायातील लोक या संस्थेत शिक्षण घेतात. विद्यार्थी प्रवेश परिक्षांची तयारी करत असताना हा भयानक हल्ला करण्यात आला आहे. या परिसरातील पोलिसांचे प्रवक्ते खलिद झरदान यांनी या स्फोटाची माहिती दिली आहे.

दरम्यान या हल्ल्याची अजून कुणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही, असे सांगण्यात आले आहे. काबूलमध्ये बॉमस्फोट, आत्मघाती हल्ले होण्याचे प्रमाण आधिकच वाढले आहे. या महिण्यातच सुरवातिला रशियन दूतावासाबाहेर हल्ला झाला होता.

या हल्ल्यात सहाजण नागरिक ठार झाले होते. तर ऑगस्ट महिण्यात एका मशिदी बाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ऐकवीस नागरिकांचा मृत्यु झाला होता. आणि आता या शैक्षणिक संस्थेवर झालेल्या हल्ला यामुळे येथील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा