गोल पोस्ट महाराष्ट्र कन्नड तालुक्यात पिशोर येथे एका अल्पवयीन मुलीसोबत एका शिक्षकानेच केला गैरप्रकार

कन्नड तालुक्यात पिशोर येथे एका अल्पवयीन मुलीसोबत एका शिक्षकानेच केला गैरप्रकार

कन्नड, २२ फेब्रुवारी २०२४ : कन्नड तालुक्यात पिशोर येथे हृदय पिळून टाकणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाने अल्पवयीन मुली सोबत गैरवर्तन केल्याचे दृश्य समोर आले आहे. या संदर्भात मंगळवारी शेकडो पालकांनी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, पिशोर येथील अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.

तक्रार करताना शेकडो पालक हे महाविद्यालयात हजर होते. सदर संशयीत आरोपी वाय. यु. नवले यांनी दहावीत शिकणाऱ्या एका मुलीसोबत गैरवर्तन केले अशी तक्रार या पालकांकडून होत आहे. या संदर्भात सदर शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी त्या अर्जाद्वारे करण्यात आली आणि असे परत होऊ नये याची दखल घेण्याची मागणी देखील महाविद्यालयाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांना केली आहे. पण या संदर्भात पिशोर येथील पोलीस स्टेशनमध्ये अद्याप कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचे पिशोर पोलीस स्टेशन कडून सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रवींद्र खरात

error: Content is protected !!
Exit mobile version