चेक पोस्टवर नाईट ड्युटीवर निघालेल्या शिक्षकाचा अपघातात मृत्यू

पुरंदर, दि. १३ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील वीर येथील रवींद्रनाथ टागोर विद्यालयाच्या शिक्षकाचा काल रात्री आपघाती मृत्यू झाला आहे. संजय खेडेकर (वय ३५) अस मृत शिक्षकचे नाव आहे. तोंडल येथील चेक नाक्यावर ते नाईट ड्युटीसाठी निघाले होते.

रस्त्याने जात असताना रात्री ९ वाजता कमथाडी येथे त्यांच्या गाडीचा आपघत झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र चेक नाके हटवले असताना पुरंदर मध्येच चेक नाके कशाला ? असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून विचारला जातो आहे. चेक पोस्ट वरील ड्युटी बंद करण्यासाठी शिक्षक संघटनानी यापूर्वीच मागणी केली आहे. रात्री झालेल्या अपघाताने तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षकांच्या चेक पोस्ट वरील नेमणुका रद्द करा: आ. संजय जगताप                                                        प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आणि शिक्षिका यांनी गेले दोन महिने अतिशय प्रामाणिक पणे नाकाबंदी आणि सर्व्हेचे काम केले असून नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश करताना त्यांचेही स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्यांनाही आराम अत्यावश्यक असून. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत शिक्षकांना या कामातून तातडीने मुक्त करावे अशा सूचना पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी प्रांतअधिकाऱ्यांना काल दुपारीच दिल्या आहेत.

प्रांताधिकारीने सकारात्मक भूमिका घेतली असून उद्या याबाबतचा आदेश देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा