गोल पोस्ट गुन्हा हैदराबादमध्ये रचला होता दहशतवादी हल्ल्याचा कट; तिघांना अटक

हैदराबादमध्ये रचला होता दहशतवादी हल्ल्याचा कट; तिघांना अटक

हैदराबाद, ५ फेब्रुवारी २०२३ : राष्ट्रीय तपास संस्थेने हैदराबादमध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोहम्मद जाहिद, माज हसन फारुख आणि समीउद्दीन अशी या दहशतवाधांची नावे आहेत. तिघांनाही बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुख्य आरोपी जाहिदने लष्कर आणि ‘आयएसआय’च्या सांगण्यावरून माज हसन आणि समीउद्दीनसारख्या अनेक तरुणांची भरती केल्याचा आरोप आहे. गेल्या महिन्यात २५ जानेवारी रोजी या तीन आरोपींसह अन्य काहीजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहिदने त्यांच्या साथीदारांसह सामान्य लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी हैदराबादमध्ये बॉंबस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. जाहिदने हे सर्व पाकिस्तानातील हॅंडलर्सकडून हॅंडग्रेनेड देखील मिळाले होते. त्यांना गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या, असेही ‘एनआयए’ला तपासात आढळून आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version