तेरा वर्षीय मुलीच्या पोटातून काढले अर्धा किलो केस

तामिळनाडू : तामिळनाडूतील १३ वर्षीय मुलीच्या पोटात अर्धा किलो केस आणि रिकामे शॅम्पूची पाकिटे आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुलीच्या पोटाच्या तपासण्या केल्यानंतर पोटात बॉलच्या आकारासारखं काहीतरी आढळलं आणि डॉक्टरांनी तो आधी एंडोस्कोपीने काढण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न अयशस्वी झाला. तामिळनाडू शहर हॉस्पिटलने १३ वर्षांच्या मुलीच्या पोटातून रिक्त शॅम्पू आणि अर्धा किलोहून अधिक मानवी केस काढले आहेत. सातवीत शिकणारी मुलगी गेल्या काही महिन्यांपासून सतत पोटदुखीची तक्रार करत होती. त्यामुळे पालकांनी तिला तिथल्या खासगी व्हीजीएम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले.

याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, पोटाचं स्कॅन केल्यानंतर पोटात वस्तूसारखा एक बॉल आढळला आणि डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे ती वस्तू काढण्याचा निर्णय घेतला.
परंतु , प्रयत्न अयशस्वी झाल्याने बाहेरील कण काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार, सर्जन गोकुळ कृपाशंकर आणि त्यांच्या पथकाने शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून केस आणि रिक्त शैम्पूचे पाकिटं यशस्वीरित्या काढले असल्याची माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष व्ही. जी. मोहनप्रसाद यांनी दिली.

जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे मुलगी मानसिकरित्या अस्वस्थ झाली होती. त्या डिप्रेशनमध्ये जाऊन रिक्त पॅकेट्स आणि केसांसारख्या वस्तू तिने खाल्ल्या असाव्या. त्यातून तिला वारंवार वेदना होत होत्या. पण, आता मुलगी पूर्णपणे बरी आहे आणि तिची प्रकृती सुधारतेय. “

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा