मनमाड येथील संस्कृती संवर्धन समितीतर्फे उद्यापासून तीनदिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला

मनमाड, ९ जानेवारी २०२३ : मनमाड येथील संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला मंगळवारी (ता. १०) प्रारंभ होत आहे. अभिनेते शरद पोंक्षे,
डॉ. हेमंत ओस्तवाल, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या व्याख्यानाचा आस्वाद मनमाडकरांना मिळणार आहे.

ता. १०, ११ १२ जानेवारी या तीन दिवसांत मान्यवर व्याख्यात्यांचे विचार ऐकण्याची पर्वणी मनमाडकरांना लाभणार आहे. मंगळवारी (ता. १०) अभिनेते शरद पोंक्षे यांच्या ‘वंदे मातरम्’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आमदार सुहास कांदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती बँकेचे संचालक अशोक शिंगी, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, दिलीप बेदमुथा उपस्थित असणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : नाना अहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा