पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी एकूण १६६२ उमेदवारी अर्ज दाखल

पुरंदर, ३१ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यात ६८ ग्रामपंचायती साठीचे गाव कारभारी निवडण्यासाठी निवडणुक होतेय.
दिनांक २३ डिसेंबर पासून अर्ज भरण्यासाठी सुरवात झाली तेव्हा पासून काल अखेरच्या दिवशी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत १६६२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पुरंदर तालुक्यातील विविध गावातून दि. २३ डिसेंबर रोजी २ अर्ज, दि. २४ डिसेंबर रोजी २४ अर्ज, दि. २८ डिसेंबर रोजी १९६ अर्ज, दि. २९ डिसेंबर रोजी ६३९ अर्ज तर शेवटच्या दिवशी दि. ३० रोजी ८०० अर्ज दाखल झाले आहेत.

पुरंदर तालुक्यातील गावनियाह इच्छुक उमेदवार पुढिल प्रमाणे :- अस्करवाडी – २०, तोंडल – २५, कोडीत बुद्रुक – १६, सोमर्डी – २१, थोपेवाडी – वारवडी – २१, पानवडी – ७, लवतळवाडी – ८, टेकवडी – २७, मावडी सुपे – १४, झेंडेवाडी – १४, पिसे – १५, खानवडी – ७, पिसुर्डी – ३२, कुंभारवळण -१९, नाझरे सुपे -१०, तक्रारवाडी -७, वाळूंज – २९, हारगुडे -२५, देवडी – ७, राजेवाडी -२०, पोंढे – १६, अंबोडी – १४, रिसे -२२, पिंगोरी – २५, दौंडज -३०, सटलवाडी – १९, हरणी – २६, भिवरी – १५, मावडी क.प – २७, मांढर – १७, बोपगाव -.९, पुरपोखर – २०, वाघापूर – ३६, नायगाव – ९, साकुर्डे -३६, राख – २०, पांडेश्वर -११, जेऊर -३४,केतक वळे – २३, हिवरे – ३५, शिवरी – ११, जवळार्जुन – ४२, माहुर – २४, धालेवाडी – २०, नाझरे क.प – ३९, गुर्होळी – २०, पारगाव – २४, आंबळे – २८, काळदरी – २५, सोनोरी -२६, सुपे खुर्द -२४, पिंपरे खुर्द – २६, परिंचे – ३०, कोडीत बूद्रुक -२९, पिसर्वे – २५, गराडे – ५५, चांबळी -२९,मांडकी – ३७, कोळविहीरे -३०, खळद – ३५, बेलसर – ३८, भिवडी – ३४, दिवे – ५१, निरा – शिवतक्रार – ८८, निळुंज -.१०, पिंपळे – २३, पिंपरी – ३०, बोऱ्हाळवाडी – १८

इच्छुक उमेदवारांनी बुधवरी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज दाखल केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा