जळगावमध्ये पोलिसांच्या वाहनांवर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार

जळगाव, ३० जून २०२३: पोलिसांच्या वाहनांवर झाड कोसळून झालेल्या अपघातात पोलिस अधिकाऱ्यासह चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एरंडोल शहराजवळ गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दृर्घटनेत इतर तीन कर्मचाऱ्यांना देखील दुखापत झाली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्याच्या तपासासाठी जळगाव गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पिलखोड, तालुका चाळीसगाव येथे शासकीय वाहनाने गेले होते. चौकशीनंतर रात्री पथक जळगावकडे येत असताना एरंडोल शहराजवळील अंजनी धरणाजवळ, वादळी वाऱ्यामुळे जीपच्या पुढील भागांवर झाड कोसळले.

यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी यांचा मृत्यू झाला असून चंद्रकांत शिंदे, निलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे देखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. जखमी तिघाही पोलिसांना तातडीने जळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा