ब्राझीलच्या नदीमध्ये आली चक्क कासवांची त्सुनामी… जीव वैज्ञानिक चकित

8

ब्राझील, १७ डिसेंबर २०२०: त्सुनामी तर तुम्ही पाहिलीच असेल. पण, ब्राझीलच्या नदीत त्सुनामी आली, ती ही पाण्याची नसून या त्सुनामीमध्ये नदीच्या आतून छोट्या कासवांची एक संपूर्ण लाट बाहेर येत होती. ही कासवं किनाऱ्यावर पडलेल्या वाळूकडं वेगानं जात असताना दिसले. काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊया…

ब्राझीलच्या द वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीनं (डब्ल्यूसीएस) आपल्या ट्विटर हँडलवर या हजारो कासवांची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. डब्ल्यूसीएस’नं म्हटलं आहे की, ही जायंट साउथ अमेरिकन रिवर टर्टलची पिल्लं आहेत, ही पिल्लं काही दिवसांपूर्वीच अंड्यातून बाहेर पडली होती.

ब्राझील ही ॲमेझॉन नदीची एक शाखा आहे जिला पुरुष नदी असं देखील म्हणतात. या नदीच्या काठावर विशालकाय दक्षिण अमेरिकन कासवांची हजारो पिल्लं पाहिली गेली. डब्ल्यूसीएस’नं सांगितलं की, दोन दिवसांत येथे सुमारे ९२ हजार कासव दिसले. पहिल्या दिवशी ७१ हजार आणि दुसर्‍या दिवशी २१ हजार कासव नदीतून बाहेर पडून किनाऱ्यावर आले.

डब्ल्यूसीएस’नं सांगितलं की, एक कासव जोडी सहसा एकावेळी ८० ते १२० अंडी देतात. या अंड्यांपासून ६० दिवसानंतर, पिल्लं बाहेर येऊ लागतात. याच कारणामुळं ब्राझीलमधील अबुफारी बायोलॉजिकल रिझर्वमधून जात असलेल्या पुरुष नदीच्या काठावर कासवांची त्सुनामी आली.

जायंट दक्षिण अमेरिकन कासवाची पिल्लं आपल्या दातांनी अंडी फोडत बाहेर पडतात. त्यांना आपल्या घरट्यापासून किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागतो. ते संथ गतीने किनाऱ्याकडं सरकत असतात. सहसा ही कासवं मोठ्या समूहानं समुद्र किनाऱ्याकडं सरकत असतात, त्यामुळं ब्राझीलमध्ये असा प्रकार दिसून आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा