धुळ्यात पार पडला अनोखा विवाह सोहळा

धुळे, दि.९ मे २०२०: सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे लग्न संमारंभावर मोठे संकट ओढवल्याचे आपण पाहतो. काही जण घरगुती पद्धतीने विवाह सोहळे पार पाडत आहे. काही जण ऑनलाइन पद्धतीने लग्न करताना दिसत आहेत. मात्र धुळ्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

या लग्नात चार फुटाची नवरी आणि तीन फुटाचा नवरा अशी ही नवरा बायकोची जोडी सोशल मीडियावर सर्वांचे आकर्षण ठरत आहे. नवरीचे नाव नयना आणि नवरदेवाचे नाव झामरु कोळी. झामरु हा २९ वर्षांचा आहे तर नयना ही १९ वर्षांची आहे. नवरदेवाचे शिक्षण १० आणि नवरीचे शिक्षण १२ पर्यंत झालेले आहे.

लॉकडाऊनच्या अगोदर या दोघांच लग्न ठरलं होतं. मात्र लॉकडाऊन आल्यामुळे ते काही दिवस रखडले होते. मात्र या दोघांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सोशल डिस्टस्टिंगचे पालन करत धुळ्यात साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. बाहुल्यांचे लग्न पार पडतंय की काय असा भास यावेळी होत होता.

मात्र या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा