मृतदेह हिंदू व्यक्तीचा, अंत्यसंस्कार केले मुस्लिम व्यक्तींनी ; घडवले माणुसकीचे दर्शन

पुणे, दि.२५ मे २०२० : हवेली तालुक्यातील केसनंद गावात एका हिंदू समाजातील व्यक्तीचे निधन झाले. मात्र त्या मृत व्यक्तीचे जवळचे नातेवाईक कोणीही नव्हते. त्यामुळे त्याचे अंतिम संस्कार करण्यासाठी कोणीच नव्हते. मात्र त्याच परिसरातील मुस्लिम समाजातील काही तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले.

सध्या लॉकडाऊनमुळे कोणालाही कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. त्यामुळे कितीही नातेवाईक असले तरी काही उपयोग होत नाही. मात्र केसनंद मधील या घटनेने समाजात एक आदर्श घालून दिला आहे.

त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक लॉकडाऊनमुळे दुसऱ्या गावी अडकल्याने अंत्यसंस्कारासाठी कोणीच येवू शकत नव्हते. त्यामुळे एक मोठी समस्या उभी राहिली होती. अशावेळी परिसरात राहणारे मुस्लिम हिंदू बांधव पुढे येत त्यांनी अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले.

सामाजिक बांधिलकी जपत हिंदू मुस्लिम बांधवांनी राम शेकू क्षीरसागर यांना आपल्या खांद्यावर घेऊन हिंदू स्मशान भूमीमध्ये ‘राम नाम सत्य है’ चा जप करत घेवून जावून त्यांच्या अंत्यविधी केला .

हे अंत्यसंस्कार करतेवेळी जानमहमद पठाण, आप्पा शेख,रहिमभाई शेख,आसीफ शेख,शद्दाम शेख, अलताप शेख, साहेबराव जगताप, बच्चन आंळदे गावचे पोलिस पाटिल पंडित हरगुडे  यांनी पुढाकार घेत  हा शेजार धर्म आणि माणुसकीचा धर्म आहे जो आम्ही पार पाडला. अशा काळात अशाच माणुसकीची गरज असल्याचे सांगून त्यांना श्रध्दांजली वाहिली . या घटनेने केसनंदवासीयांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या संकटात अशीच एकमेकांना साथ देणे गरजेची आहे.असे मत आता व्यक्त होऊ लागले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा