सुनेच्या खोलीतून आला आवाज अन् सासऱ्याने दरवाजा उघडला…..

8

गोरखपूर, २१ जानेवारी २०२१: उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून मंगळवारी रात्री एका सासऱ्याने आपल्या सुनेला दोन मुलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण गोरखपूरच्या श्यामदेउरवान पोलिस स्टेशन परिसरातील गुलरिहा भागातील एका खेड्याशी संबंधित आहे. जिथे सासरा मंगळवारी रात्री आपल्या घरी एकटा होता तेव्हा त्याला आपल्या सुनेच्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागला. जेव्हा सासऱ्याला शंका आली तेव्हा त्याने गावातील इतर लोकांनाही बोलावले आणि मग खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. येथे दोन मुले या सुनेसोबत आक्षेपार्ह स्थितीत होते.

आजच्या युगात गु-गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे की लोकांमध्ये आता प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कोणावरही विश्वास ठेवता येत नाही कारण सध्याची वेळ खूप वाईट बनली आहे. यानंतर ग्रामस्थांनी दोन्ही तरुणांना रंगेहाथ पकडले आणि जोरदार मारहाण केली आणि मग पोलिसांना बोलावून दोघानाही स्वाधीन केले गेले. पोलिसांनी यातील एका तरूणाकडून चाकूही जप्त केला आहे.

अमर उजालाच्या बातमीनुसार, सासरच्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे की, घरातील सुनेचे गावातील दोन तरुणांशी अवैध संबंध आहेत आणि सासऱ्याने रंगेहाथ पकडल्यावर यातील एका तरुणाने सासऱ्यावर हल्ला देखील केला पण, सासर्याने आरडा आरोड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. सासऱ्यानेही या तरूणास जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

जेव्हा गावकऱ्यांनी दोन्ही तरुणांना रंगेहाथ पकडले, त्यावेळी एका तरूणाने चाकूने हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्नही केला. पण, मोठ्या संख्येने जमा झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर चिडलेल्या ग्रामस्थांनी तिघांनाही बेदम मारहाण केली. सध्या पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा