पदक विजेता आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर मुकुंद आहेर याच मनमाडला जंगी स्वागत.

नाशिक, २० ऑगस्ट २०२३ : नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेचा मुकुंद संतोष आहेर, याने आपल्या सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. सुवर्णपदक, कांस्यपदक, व रौप्यपदक पटकावत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान त्याने पटकवला. या निमित्त मुकुंद आहेर याची आज मनमाड येथील हनुमान नगर येथून त्याच्या राहत्या घरापासून वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर,नातलग,क्रीडाप्रेमी,मित्र मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मनमाड शहरातील अनेक खेळाडूंना पारखून त्यांना क्रीडा क्षेत्रातील यशाच्या शिखरावर पोहचविणारे छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक, प्रवीण व्यवहारे व सलग सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतीय संघाची प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी करणारी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर तसेच भारतीय संघात निवड झालेली आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांशा व्यवहारे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

देशासह महाराष्ट्राचे आणि नाशिक जिल्ह्यातील मनमाड चे नाव मुकुंद ने जागतिक स्तरावर उंचावले. या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. या मिरवणुकीचे आयोजन नाना आहेर मित्र मंडळ हनुमान नगर यांनी केले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहेर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा