नवी दिल्ली, दि. २६ जुलै २०२०: सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर बाॅलिवुड चित्रपटसृष्टीचा काळा चेहरा समोर आला. ज्यामधे अनेक कलाकारांनी आपली मते उघडपणे व्यक्त केली. ज्यात त्यांनी आपल्या विरुद्ध कशा पद्धतीने कारस्थानं करण्यात आली हे सांगितले. सुरवात कंगना रनौतने केली आणि त्या पाठोपाठ अनेक कलाकारांनी बाॅलिवुडच्या घराणेशाही विरोधात आवाज उठवला. त्यातच आता ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर. रहमान यांनी देखील त्यांच्यावर होत असलेल्या कारस्थानाचे मत उघडपणे व्यक्त केले आहे.
रेडिओ मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा ए.आर. रहमान यांना विचारले गेले की ते बॉलिवूड चित्रपटांसाठी अधिक संगीत का तयार करीत नाहीत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना पुरेसे काम मिळत नाही कारण “त्यांच्याविरूद्ध एक संपूर्ण टोळी कार्यरत आहे. २४ जून रोजी डिस्ने + हॉटस्टारवर प्रीमियर झालेल्या सुशांत सिंग राजपूतच्या शेवटच्या चित्रपटासाठी संगीतकाराने नऊ गाणी रचली होती. तेव्हा पुढे ते म्हणाले बॉलिवूडमधील काही लोक त्यांच्याबद्दल “खोटी अफवा” पसरवत आहेत.ते म्हणाले, “पाहा, मी चांगल्या चित्रपटांना नाकारत नाही, परंतु मला असे वाटते की अशी एक टोळी आहे, जी अफवा पसरवित आहे.”
ए.आर. रहमान यांनी मुलाखतीच्या वेळी हेही उघड केले होते की दिल बेचरा या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबरा यांना बॉलिवूडमधील काही लोकांनी त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, आणि पहिल्याच चित्रपटासाठी संगीत तयार करण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ नका असा सल्ला देण्यात आला होता. “जेव्हा मुकेश छाब्रा माझ्याकडे आला तेव्हा मी त्यांना दोन दिवसांत चार गाणी दिली. ते म्हणाले, ‘सर, किती लोक म्हणाले, जाऊ नका, त्याच्याकडे जाऊ नका. त्यांनी मला या गोष्टी नंतर सांगितल्या.’ मी ते ऐकले आणि मी म्हणालो, ‘हो ठीक आहे, आता मला समजले आहे की मी कमी काम का करत आहे आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीत.’ मी गडद चित्रपट करत आहे कारण संपूर्ण टोळी माझ्या विरूद्ध काम करत आहे, त्यांना हे ठाऊकच आहे की ते नुकसान करीत आहेत, “असे प्रख्यात संगीतकारांनी सांगितले.
ए.आर. रहमान यांनी गुरु, रॉकस्टार, दिल से, रोजा, लगान, रांझाना आणि स्वदेस यासारख्या समीक्षकांच्या प्रशंसित चित्रपटांसाठी संगीत दिले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी