Woman Marries Seven Men in Delhi: आजवर आपण एका महिलेला एक किंवा एकापेक्षा जास्त पती असलेल्या घटना पहिल्याच असतील. काहींच प्रेम प्रकरण परिवाराला माहीत असते, तर काहींचा लपून छापून कार्यक्रम सुरू असतो.आपल्याकडे एक पद्धत आहे की एका महिलेला तिच्या पतीचा स्वभाव पटत नसेल किंवा त्याच्यांत सतत भांडण होत असतील. तर एकमेकांच्या समजुतीने घटस्फोट घेतला जातो. पण देशाच्या राजधानीत अशी घटना घडली आहे. ती ऐकल्यावर तुमची झोपच उडून जाईल.
दिल्लीत एका महिलेचा कारणामा समोर आला असून सध्या सगळीकडे तीची चर्चा रंगली आहे. या महिलेनं आधीच्या नवऱ्यांसोबत कोणताही घटस्फोट न घेता एक नव्हे, तर तब्बल ७ पुरुषांसोबत लग्न केल आहे. याशिवाय लग्न केलेल्या पुरुषाकडून पैसे घेऊन ती फरार झाली आहे. या महिलेन केलेल्या कारनाम्याबाबत न्यूज १८ हिंदीच्या माहितीनुसार, महिलेच्या सातव्या पतीने सांगितले की, त्यांच्या पत्नीच नाव ज्योती उर्फ कित्तू आहे. त्याने सांगितल की १५ दिवसांच्या आधीच माझ्या पतीच्या करनाम्याबाबत मला माहिती मिळाली. पुढे तो म्हणाला की, तीचे बाकीचे पती सुद्धा दिल्लीतच राहणारे असून ती महिला आधी तरुणाना आपल्या प्रेमात पडायची आणि धमकी देऊन त्याच्यासोबत लग्न करायची आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायची.
पुढे एका सूरज नावाच्या पतीने सांगितले की,आमची गाठ एका धार्मिक कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर आमच्यात बोलणं सुरू झाल आणि आम्ही प्रेमात पडलो. ज्यावेळी ज्योति गर्भवती झाली तेव्हा तीने माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला.सुरज पुढे म्हणाला, काही दिवस आमचा संसार सुरळीत सुरू होता. पण काही महिन्यांनी तीने मला त्रास देयला सुरुवात केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर